पुणे : अलिकडच्या काळात विवाह करताना फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नुकताच विवाह करताना फसवणूक केल्याचा पुण्यातून उघडकीस आला आहे. पहिला विवाह झाल्याचे लपवून ठेवत दुसरा विवाह करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका डॉक्टरसह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेने याबाबत तिच्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरने मोटार खरेदीसाठी महिलेकडून ३ लाख रुपये घेतले. नवीन घर घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. ‘तुझा माझ्याशी कायदेशीर विवाह झाला नाही. माझा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नाही,’ असे डॉक्टर पतीने महिलेला सांगितल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरचा पहिला विवाह झाला होता. त्याचे पत्नीबरोबर पटत नसल्याने दोघे वेगळे राहत होते. घटस्फोट झालेला नसताना डॉक्टरने फिर्यादी महिलेशी डिसेंबर २०१६ मध्ये दुसरा विवाह केला. त्यानंतर डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबियांनी महिलेचा छळ सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील बड्या नेत्याच्या घराबाहेर जादूटोणा, नेमका प्रकार काय?
-रमाजान ईदनिमित्त शहरातील ‘या’ भागातील वाहतूकीत बदल
-मुंडेंनी मुलांचा स्विकार केला पत्नीचा का नाही?, तृप्ती देसाईंचा आक्रमक सवाल
-आमदार झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात हेमंत रासनेंची प्रभावी कामगिरी
-आपलं नपुंसकत्व लपवण्यासाठी मित्रालाच आणलं घरी अन्…. पुण्यातील धक्कादायक प्रकार