पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यातच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. या हे प्रकरण खूप चिघळले म्हणून पुणे पोलिसांनी शहरात कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरा शहरात अनेक भागात नाकाबंदी करुन वाहन चालक मद्यपींची तपासणी करत आहेत. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जात आहे. तसेच पुणे ग्रामीण भागातील पोलीसही अलर्ट झाले आहेत. शहरातील कॅफे, हॉटेल, लॉज आणि बारवर छापा टाकत कारवाई करत आहेत. यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये कॉलेजमधील तरुण-तरुणी तिथे नको त्या अवस्थेमध्ये दिसले आहेत. कॅफेच्या नावाखाली प्रेमाचा रंग उधळताना दिसत आहेत. पुण्यातील राजगुरुनगर शहरातील लॉज आणि कॅफेवर राजगुरुनगर पोलीसांनी छापा टाकला त्यावेळी पोलिसांना कॉलेजमधील तरूण-तरूणी अश्लिल प्रकार करणारी जोडपी आढळून आली आहेत. धक्कादायक म्हणजे कॅफेच्या नावाखाली अंधार करुन महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा हा अश्लिल प्रकार सुरू होता.
सध्या पुणे शहरातील या अपघात प्रकरणानंतर नियम कडक करण्यात आले आहेत. लॉजमध्ये जाण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागत असल्यामुळे हे प्रेमी युगूल कॅफेकडे वळाली आहेत. त्यातच कॅफेच्या नावाखाली काहींनी हाच व्यवसाय सुरु केला आहे. प्रेमी जोडप्यांना कॅफेमध्ये विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. ओळखपत्र न दाखवता प्रवेश मिळत असल्याने जोडपी जास्तीचे पैसे देतात.
महत्वाच्या बातम्या-
-‘थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स करणाऱ्याला समज द्या’; अंजली दमानिया कोणामुळे संतापल्या?
-‘जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, पण…’, कालीचरण महाराजांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य
-पुणे हिट अँड रन: “या प्रकरणात आमदाराचा मुलगा, २ उपमुख्यमंत्री…”; नाना पटोलेंने केले धडाधड आरोप
Benefits of soaked dates : आरोग्यासाठी खजूर वरदान! जाणून घ्या ‘हे’ चमत्कारीक फायदे
-नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, ‘अनेक महिन्यांपासू दोघेही…’