पुणे : पुणे शहरामध्ये कर्कश आवाजाचे सायलेंसर असणाऱ्या बाईकवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली आहे. रात्र-अपरात्री या गाड्या शहरातीन फिरताना फटाफट किंवा बंदुकीची गोळी सुटल्यासारखा आवाज येत. परिणामी मध्यरात्री गाढ झोपेत असणाऱ्या नागरिकांची झोपमोड होते. हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली आहे. २५ बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याविरुद्ध दंडात्म कारवाई करत सायलेन्सर जप्त केले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लोणी काळभोर भागात बुलेटचालक तरुण भरधाव वेगाने जातात. कर्णकर्कश सायलेन्सरमधून फटाके फुटल्यासारखे आवाज येतात,अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी तयार केलेल्या विशेष पथकामध्ये ४ अधिकारी, १५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
लोणी काळभोर परिसरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन २५ बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. या २५ बुलेट चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करत २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या बुलेटचे सायलेन्सर लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केले आहे.
दरम्यान, अशा बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवण्यात येतात. अशा प्रकारच्या सायलेन्सरवर बंदी घालण्यात आली आहे. नाना पेठेतील वाहनांचे सुटे भाग विक्री करणारे काही दुकानदार अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून देतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल
-पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच
-शिंदेंची भेट धंगेकरांना महागात, काँग्रेसने महत्त्वाच्या कमिटीत घेणं टाळलं; नेमकं काय घडलं?
-गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?