पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. वाहनांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहतूक कोंडीमुळे अनेक जण सिग्नल्स पाळताना दिसत नाहीत. अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांकडून गेल्या ११ महिन्यात तब्बल ४१ हजार ६९५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
१ जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या अकरा महिन्यांच्या कालावधीत ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून ४१ हजार ६९५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून ३ कोटी ४ लाख २५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. कारवाईसाठी एक अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढील काळात कारवाईची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले आहे.
पुणे शहरात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईतून तब्बल ३ कोटी ४ लाख २५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये २५० ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी ‘सीसीटीव्ही’ फुटेज पाहण्याची व्यवस्था नव्हती. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात साडेतीन हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले. ऑगस्ट २०२२ मध्ये सुरु झालेल्या सीसीटीव्हीमुळे स्मार्ट सिटीच्या निगडी येथील कार्यालयातून वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, झेब्रा क्रॉसिंग उभी राहणारी वाहने, एका दुचाकीवरून तिघे जण प्रवास करणारे, सीट बेल्ट न वापरणारे चारचाकी वाहनचालक, नो-एन्ट्रीतून येणारी वाहने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) तोडणाऱ्या वाहनांवरील कारवाईला आता वेग आला असून सीसीटीव्हीद्वारे कारवाईसाठी पाच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत पुण्यानं पटकावलं पाचवा क्रमांक; कशात केली सर्वाधिक गुंतवणूक?
-पुण्यात थंडी घटली पण थंडगार वाऱ्यामुळं पसरली धुक्याची चादर
-रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणं पडलं महागात; नळ स्टॉपवरील ‘त्या’ स्टॉल धारकांवर गुन्हे दाखल
-आता आरटीओला न जाताही मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; कसं? वाचा सविस्तर…
-नागरिकांच्या दारात बँड वाजवला, करबुडव्यांच्या मिळकती जप्त, पालिकेची १८ दिवसांत ४० कोटींची वसुली