विरेश आंधळकर : पुणे लोकसभा मतदार संघामध्ये यंदा भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. भाजपला महायुतीची तर काँग्रेसला महाविकास आघाडीची साथ मिळाल्याने दोघांमध्ये चांगलाच चुरशीचा सामना रंगला. मात्र भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी १ लाख 23 हजारांचे मताधिक्य घेत मैदान मारले. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे स्वतः आमदार असलेल्या कसबा मतदारसंघात देखील त्यांना मताधिक्य राखता आले नाही. सहापैकी केवळ एका मतदार संघात धंगेकर यांना आघाडी मिळाली, तो मतदार संघ म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट.
कोथरूड, पर्वती, कसबा पेठ, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर विधानसभेत मुरलीधर मोहोळ यांनी मताधिक्य राखले. परंतु पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे हे भाजपचे विद्यमान आमदार असताना देखील त्यांना लीड मिळवता आला नाही. त्यामुळे येथे भाजपची डोकेदुखी वाढतानाच काँग्रेसला मात्र अच्छे दिन आल्याचं दिसत आहे. काँग्रेसला मिळालेलं मताधिक्य हे माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासाठी अच्छे दिन आणणारे ठरू शकते, तर भाजपच्या सुनील कांबळेंसाठी मात्र धोक्याची घंटा वाजल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
2014 साली आलेल्या मोदी लाटेत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे दिलीप कांबळे हे विजयी झाले. तर 2019 साली त्यांचेच बंधू सुनील कांबळे यांनी येथून विजय मिळवला. दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या भागातून पालिकेत देखील भाजपचे अनेक नगरसेवक विजयी झाले. यंदा मात्र राज्यामध्ये काँग्रेससाठी निर्माण झालेल्या सकारात्मक राजकारणाचे पडसाद कॅन्टोन्मेंटमध्ये पहायला मिळाले. इतर पाच मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली असताना देखील कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेस धंगेकर यांना 16 हजारांचे मताधिक्य मिळवण्यात यश आले. हीच बाब भाजपच्या सुनील कांबळेंना डोकेदुखी तर काँग्रेसच्या बागवेंसाठी अच्छे दिन ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या-
-पालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; या कर्मचाऱ्यांना दिला सज्जड दम, वाचा काय नेमकं प्रकरण
-विशाल अग्रवालच्या अडचणी वाढल्या; महाबळेश्वरमधील ‘त्या’ पंचतारांकित हॉटेलवर चालवला जेसीबी
-अजित पवार गटाचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, ‘आम्ही तुमच्यासोबत’
-पुणे हिट अँन रन: रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर
-Baramati | विजयानंतर सुप्रिया सुळे अजितदादांंच्या निवासस्थानी; म्हणाल्या…