पुणे : सत्ताधारी महायुतीमधील अनेकांची उठबस ही कुख्यात गुंडांसोबत असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार झाल्याचे पहायला मिळाले. कुख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यांनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील गजा मारणेशी जवळीक असल्याचे समोर आले होते. त्यातच आता भाजपच्या नेत्यांशीही गजा मारणेची जवळीक असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मंगळवारी पुणे शहरामध्ये सार्वजनिक दहिहंडी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे उपस्थित होते. याच कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटलांचा सत्कार गुंड गजानन मारणेने केल्याचे पहायला मिळाले. या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
गुंड गजा मारणे हा कोथरुड भागातील रहिवासी असून चंद्रकांत पाटील हे कोथरुडचे आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून पुन्हा निवडणूक लढवसाठी चंद्रकांत पाटील तयारी करत आहेत. आणि अशातच आता गुंडांसोबतचे व्हिडीओ व्हायरल होत असून विरोधकांना भाजपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-..तर लाडकी बहीण योजनाच बंद करू, न्यायालयाने सरकारला फटकारले; नेमकं काय घडलं?
-पुणे हिट अँड रन प्रकरण: आरोपी मुलावर कारवाई करण्याबाबत पोलिसांनी केली ‘ही’ मोठी मागणी
-‘सरकारने आमच्या दैवताचा अपमान करू नये’; सुप्रिया सुळेंचे बारामतीत आंदोलन
-पत्नीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अन् प्रियकराने दिली धमकी, पतीने घेतला गळफास
-विधानसभेसाठी पुण्यात शरद पवारांची खेळी! मागवले आठही मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज