पुणे : पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा कुख्यात गुंड गजा मारणे टोळीचा धुमाकूळ पहायला मिळाला. पुण्यातील एका आयटी कंपनीतील एका तरुणाला तथा भाजपच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या टोळीतील चौघांनी बेदम मारहाण केली. यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक जण फरार आहे. पुण्यात पोहचताच मुरलीधर मोहोळ कार्यकर्त्याचा घरी जात त्याच्या तब्बेतीची चौकशी केली. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दखल घेत पुण्याच्या पोलीस आयुक्त्यांची चांगलीच कानघडणी केल्याचं पहायला मिळालं आहे. मुरलीधर मोहोळ काल (शुक्रवारी) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
“भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी सपत्नीक जाऊन भेट घेतली. तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये असल्याने पुण्यात पोहोचल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचलो. देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही.
‘आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती पावले उचलावीत. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी’, अशा सूचना देखील मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त आयुक्त अमितेश कुमार यांना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?
-अमित शहा पुणे दौऱ्यावर; शहरात कडक बंदोबंस्त, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुकीतही बदल
-Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल