पुणे : पुणे शहरातील विविध IT कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करत आहेत. नुकतीच खराडी येथील आय टी कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचा तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांनेच अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजप महिला आघाडी शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात भाजप महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने काही मागण्या केल्या आहेत.
कोणत्या मागण्या केल्या आहेत?
1) आपण शहरातील सर्व IT कंपन्यांना तातडीने स्वतंत्र महिला कर्मचारी सुरक्षा विषयक धोरण तयार करण्याबाबत निर्देश द्यावेत.
2) या कंपन्यांमधील कर्मचारी सुटण्याच्या वेळी संबंधित परिसरात महिला पोलीसांची गस्त सुरु करावी.
3) सर्व कंपन्यांच्या आवारातील CCTV यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे व हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा.
4) या सर्व कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश द्यावेत.
भाजप महिला आघाडी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करुन याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी. याबाबत ठोस पावले उचलणार असण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले आहे. या शिष्टमंडळात महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, प्रियंका शेंडगे-शिंदे, स्वाती मोहोळ, गायत्री खडके, नेहा गोरे, अश्विनी कोसरीकर, मनीषा मोरे आणि खुशी लाटे यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाचा खून; तपासात धक्कादायक कारण आलं समोर
-मसाज पार्लरच्या नावाखाली सुरुय भलताच कारभार; पोलिसांनी मारला छापा अन्…
-फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?
-बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक