पुणे : सध्या भाजपमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. या अनुषंगाने राज्यातील शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरु असून राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या खासदारांना पुणे शहर आणि जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये या निरीक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. तसेच यंदा ओबीसी नेताच पुण्याच्या शहराध्यक्षपदी असावा, अशी मागणी केली जात आहे.
पुण्याचा शहराध्यक्ष कोण?
पुणे शहरातील विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे हे असून त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ अद्याप संपला नाही. या आधी ब्राह्मण आणि मराठा समाजातील प्रतिनिधीनींना शहराध्यक्ष पद देण्यात आले. त्यामुळे यंदा शहराध्यक्षपद हे ओबीसी नेत्याच्या हाती द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसी नेताच पुण्याचा शहराध्यक्ष होणार, अशी चर्चा सुरु आहे. सध्या आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर या ओबीसी नेत्यांची नावे शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे कोणत्या ओबीसी नेत्याच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोल्हापूरचे खासदारांकडे पुण्याची जबाबदारी
कोल्हापूरच्या खासदारांना जशी पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली तशीच पुण्यातील आमदाराला कोल्हापूरच्या निरीक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष देखील निवड होणार आहे. मात्र त्यापूर्वी मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी-चिंचवडची जबाबदारी सोपण्यात आली आहे. तर पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे कोल्हापूर शहर, हातकणंगले आणि करवीरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेश पांडे हे देखील सोलापूरची निरीक्षकपदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात काँग्रेस भाजप समर्थक आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
-वकिल महिलेला रक्त साकळे पर्यंत मारहाण; अजित पवार म्हणाले, ‘कायदा श्रेष्ठ’
-‘खोट्या शपथा घेणाऱ्या गोप्याला कुणीही फारसे महत्व देऊ नये’; अजित पवारांचे नेते पडळकरांवर आक्रमक
-‘आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, महाराष्ट्रात रहायचं असेल तर…’; अजित पवारांचं वक्तव्य
-स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल