पुणे : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने पुणेकरांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. पालिकेच्या मागणीनुसार पाण्याचा हक्काचा कोटा न देता याउलट पालिकेला दंड ठोठावला अन् भाजपवर विश्वास ठेवून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुणेकरांनी मतदान करणाऱ्या मतदारांना ठेंगा दाखवला आहे. हा प्रकार संतापजनक असल्याचं मोहन जोशी म्हणाले आहेत.
काय म्हणाले मोहन जोशी?
“शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी जलसंपदा विभागाने २१ टीएमसी पाणी महापालिकेला द्यावे, त्याचा करार करावा, अशी मागणी महारपालिकेकडून केली जात आहे. ही मागणी पूर्ण व्हावी, यासाठी भाजपचे शहरातील नेते काहीही पाठपुरावा करत नाहीत. उलट भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला थकबाकी वसुलीसाठी नोटीस पाठविली आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी केली जाणारी अडवणूक आहे.”
‘जलसंपदा खात्याने नोटीस बजावल्यानंतरही शहराचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपचे इतर खासदार, आमदार शांत बसतात हे आश्चर्यकारक आहे. निवडणुकीपूर्वी शहराला पुरेसे पाणी देऊ अशी आश्वासने द्यायची आणि नंतर या आश्वासनांना हरताळ फासायचा, हा प्रकार सुरू आहे. शहरासाठी जलसंपदा विभागाने पाण्याची वाढीव मागणी तातडीने मंजूर करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन करेल’, असा इशारा जोशी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune GBS: पुणेकरांची चिंता वाढली; शहरात एकूण किती मृत्यू?
-कसब्यात १५ हजार महिलांच्या उपस्थितीत “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
-Pune GBS: केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली पण…; नागरिक संतप्त, वाचा नेमकं काय झालं?
-आश्चर्यकारक! गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटात बाळ; नेमका काय प्रकार? वाचा…