पुणे : गणेशोत्सवाची १३० वर्षांची समृद्ध परंपरा ही आपल्या समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा फक्त उत्सवापुरता सीमित राहत नाही, तर तो समाजाशी एकरूप झालेला असतो. समाजाच्या सुख-दुःखात तो नेहमी पुढे असतो. त्याला समाजाच्या गरजांची आणि अडचणींची जाणीव असते. कोरोना काळात आपण पाहिलं की, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी पुढे सरसावले, त्यांनी सेवा आणि समर्पण याचा आदर्श घालून दिला. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार हेमंत रासने असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले आहेत. आमदार हेमंत रासने यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “हेमंत रासने यांनी आमदार झाल्यानंतर लगेचच त्यांच्या मतदारसंघात अनेक विकासकामांचा धडाका लावला आहे. ‘स्वच्छता दूत’ म्हणून ते काम करत आहेत. कसबा कचरा मुक्त करण्यासाठी सुरू केलेली त्यांची धडाकेबाज मोहीम खूप मोठी आणि कौतुकास्पद आहे”.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला मंडई मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब थोरात, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी उपमहापौर श्री. दत्ता सागरे, मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष माणिकदादा चव्हाण, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, तुळशीबाग मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, रविंद्र माळवदकर, पराग ठाकूर, बाळासाहेब मारणे, शिरीष मोहिते, पियुष शहा, संजीव जावळे, सुरेश पवार यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
आभार मानताना हेमंत रासने म्हणाले, “गणराया आणि जनतेच्या आशीर्वादाने माझ्यासारखा एक साधा गणेशोत्सव कार्यकर्ता आमदार होऊ शकला, हे माझं भाग्य आहे. आमदारपदाची शपथ घेताना मी जय गणेश आणि जय श्रीराम म्हणत शपथ घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाने माझ्या पाठीवर थाप देत ‘जय गणेश’ असे शब्द उच्चारले, तो क्षण माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण ठरला. आगामी काळात गणेशोत्सव मंडळे व कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. ऐतिहासिक कसबा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा माझा संकल्प आहे.”
आमदार हेमंत रासने यांनी जाहीर केल्याप्रमाणे वाढदिवसाला एकही अनधिकृत फ्लेक्स उभारला गेला नाही. तुळशीबागेतील ग्राहकांना उन्हाच्या त्रासातून वाचवण्यासाठी जाळीरुपी आच्छादन लावणे, ‘स्व’रूपवर्धिनी संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह शालेय साहित्याचे वाटप, पालक आणि लहान मुलांसाठी बालपणीच्या आठवणी जागवणाऱ्या ‘आपले आंगण’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
-‘लाड’क्या ठेकेदाराला लगाम, सुरक्षारक्षक पुरवण्याची निविदा विभागून दिली जाणार; नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांच्या बाकरवडीत बनवाबनवी; ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल
-पालिका करणार थेट कंपन्याकडून डांबर खरेदी मात्र, हात काळे केलेल्या अधिकाऱ्यांचं काय?
-एसटीच्या थांब्यावर अस्वच्छ, बेचव अन्न; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिले ‘हे’ आदेश
-औंधमध्ये गाळेधारकांना बेकायदा परवाने वाटप; ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश