पुणे : पुणे शहरामध्ये वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे सुसंस्कृत पुण्याची बदनामी होत असल्याने शहरात नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. १ ऑगस्ट रविवारच्या दिवशी रात्री पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची भर चौकात हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुणे शहर चांगलंच हादरुन गेलं आहे.
वनराज आंदेकर हत्याप्रकरणात शस्त्र पुरविणाऱ्या संगम संपत वाघमारेला आता अटक करण्यात आली आहे. आरोपींना शस्त्रे पुरविण्यात वाघमारे सामील असल्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. वनराज आंदेकर हत्याप्रकरणात आतापर्यंत तब्बल १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आंदेकर यांच्या तीन बहिणी, त्यांचे पती तसेच ३ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.
पुण्यातील वनराज आंदेकरांचा गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. आरोपींना संगम वाघमारेने या २० वर्षांच्या मुलाने शस्त्र पुरवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सापळा लावून मोठ्या शिताफीने आरोपीला पकडल्याची माहिती मिळत आहे. वाघमारेला अटक करून न्यायलायात हजर करण्यात आले. त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार हाती घेणार ‘तुतारी’
-‘पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा’; अजितदादा असं का म्हणाले?
-विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीत कलह; बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला अजितदादांचा रस्ता
-भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; नेमका काय प्रकार?