पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या तब्बल ३२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. एकीकडे पक्षबांधणीसाठी ठाकरेसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे पक्षाकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. ठाकरे गटाने नुकत्याच पक्षाच्या महिला आघाडी नियुक्त्या जाहीर केल्या. याच नियुक्त्यांवर नाराजी व्यक्त करत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
‘नुकत्याच झालेल्या पक्षाच्या महिला आघाडी नियुक्त्यांवर आम्ही सर्व महिला नाराज असून पक्षाचा राजीनामा देत आहोत. कारण, पक्षातील बऱ्याच महिला या जवळपास १५ ते २० वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत. या सर्वांचा सन्मान न राखता तसेच विचारात न घेता अलिकडील पक्षात आलेल्या महिलांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नाराज असून, पक्षाचा राजिनामा देऊन, कुठेही न जाता घरात बसत आहोत, असे म्हणत ठाकरे गटातील महिला कार्यकार्त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
दरम्यान, रेखा कोंडे, स्वातीताई कथलकर, करुणा घाडगे, रोहिणी कोल्हार, सोनाली सोनवणे, विजया मोहिते, अयोध्या डोईफोडे, मनीषा गरुड, जयश्री भणगे, गौरी हेट्ट्री, जयश्री वैद्य, पद्मा सुरटे, राजश्री जगताप, सुनिता वघिला, जयश्री येते, ज्योती खांदोडे, लक्ष्मी जोगदंड, सुप्रिया गुंड, शीतल फडतरे, नेहा कुलकर्णी, आशा आहेर, दिपाली विपाल, ज्योती चांदेरे, कल्पना पवार, वैशाली पुजारी, अनुपमा मांगडे, दिलापी राऊत, निलीमा दौंडकर, संगिता भिलारे, मिनाक्षी बोराटे, या महिला कार्यकर्त्यांनी आपला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका
-‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक
-दीनानाथ रुग्णालयाला पालिकेचा कर भरावाच लागणार; पालिकेने बजावली वसुलीसाठी नोटीस
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई