पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात ड्रग्स खरेदी-विक्री करताना तसेच ड्रग्सचे सेवन करताना सापडत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पुणे शहरात अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ४ जणांना पुणे आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मुंबई आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून ३ उच्चशिक्षित तरुण आणि मुंबईतून सराईत ड्रग्स डिलर अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि अशा आरोपांखाली गुन्हे शाखेने मुंबई आणि पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सिंहगड रस्ता परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ३ उच्चशिक्षित तरुणांना अटक केली. अंशुल संतोष मिश्रा (वय २७, बुलडाणा), आर्श उदय व्यास (वय २५, मुंबई), आणि पियुष शरद इंगळे (वय २२, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघे त्यांच्या ग्रुपमधील तरुणांना ओजीकुश गांजा, मेफेड्रोन आणि एलएसडी यांसारखे अमली पदार्थ विकत घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या तिघांकडून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १९.४५ लाख रुपयांचे २५१ ग्रॅम ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन, आणि ६२ मिलीग्राम एलएसडी जप्त केले असून तिघांना ताब्यात घेतले आहे. तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोवंडीच्या गौतम नगर परिसरातून फुरकान अन्सारी (वय २८) या सराईत आरोपीलाकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या १ हजार ९१० स्पास्मो प्रॉक्सीव्हॉन प्लस, नायट्राझेपाम, आणि क्लोनाझेपाम टॅब्लेट जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांची बाजारातील किंमत २४ हजार २९५ रुपये असून, आरोपीकडून ५३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून प्रशांत जगतापांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरले १२ लाख ७४ हजार
-बाबा आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण; शरद पवारांनी घेतली भेट
-मुख्यमंत्रिपदाबाबतच्या ‘त्या’ चर्चेचा मुरलीधर मोहोळांनी केला खुलासा
-‘कोणत्याही पदाची जबाबदारी दिली तरी…’; सुनील शेळकेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा