पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून म्हणून जगभर प्रसिद्धी आहे. या पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्य परदेशातूनही अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अशातच आता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतीगृहामधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वस्तीगृहाच्या जेवणामध्ये किडे, अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकास जाब विचारला त्यानंतर ही मेस अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतीगृह क्रमांक ८ या ठिकाणी १५ दिवसात दुसऱ्यांदा जेवणामध्ये किडे सापडल्याची घटना घडली आहे. यावरुन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट दिसून येत आहे.
दरम्यान, ठेकादारांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रार करूनही विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. वारंवार कारवाई करणयास टाळाटाळ होत असल्याचा आरोप आता विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच
-शिंदेंची भेट धंगेकरांना महागात, काँग्रेसने महत्त्वाच्या कमिटीत घेणं टाळलं; नेमकं काय घडलं?
-गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?
-पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?