पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार हे त्यांच्या पुण्यातील मोती बागेत होते. यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आज राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील मोदी बागेत गेल्या होत्या. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व उपमहापौर आबा बागुल यांनी देखील आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
काय म्हणाले आबा बागुल?
आता एकेक उमेदवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण पर्वती विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी विनंती शरद पवारांकडे केली. आहे. त्यावर शरद पवार म्हणाले निवडून येणारी जागा असेल तर यावर नक्की विचार करु, असे आबा बागुल म्हणाले आहेत. शरद पवार यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये आबा बागुल हे आमदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता शरद पवार पर्वतीची जागा काँग्रेसला देण्याबाबत सकारात्मक आहेत का? यावरही आबा बागुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून त्यांचा आणि काँग्रेसचा आशीर्वाद मिळाला तर मी नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होईल. पर्वती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत काँग्रेसने सर्वांना संधी दिली आहे. मला अद्याप तरी संधी मिळालेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला पक्षाने संधी द्यावी अशी माझी विनंती आहे, असेही आबा बागुल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?
-पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!
-शरद पवारांच्या मोदी बागेत सुनेत्रा पवारांची भेट; नेमकं कारण काय? राजकीय चर्चेला उधाण