पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभांपैकी एक असणाऱ्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसमध्ये धुसफूस वाढताना दिसत आहे. याला कारण ठरतेय ते शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांचा नुकताच झालेला पक्षप्रवेश. कॉंग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना बदलण्यासाठी शहरातील काही नेते सक्रीय झाले आहेत. या गटाचे नेतृत्व माजी मंत्री रमेश बागवे करतायत. आता बागवे यांच्याकडून ही मोहीम राबवली जास्त असतानाच शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत आंबेडकरी चळवळीतील मोठे नाव असणाऱ्या अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस प्रवेश घडवून आणला. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमध्ये बागवे यांच्या उमेदवारीला कात्री लावत साळवे यांच्या नावासाठी आग्रह धरला जात असल्याचं दिसत आहे. साळवे यांच्या सारखा तगडा प्रतिस्पर्धी मैदानात आल्याने रमेश बागवेंची मोठी अडचण झालीय.
पुणे शहरातील आठ विधानसभा पैकी एका असणारा कॅन्टोन्मेंट मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. देशातील सर्वात जुनी लष्करी छावणी, पुण्यातील धारावी समाजली जाणारी कासेवाडी झोपडपट्टी याच परिसरात येथे. एका बाजूला झोपडपट्टी तर दुसरीकडे कोरेगाव पार्क–मुंढवा सारखा हाय प्रोफाईल परिसर तसेच भारतीय लष्करासाठी महत्वाची असणारी सर्व कार्यालये कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास १९७८ ते १९८५ दरम्यान जनता दलाचे विठ्ठल तुपे येथून विजयी झाले होते. १९९० मध्ये कॉंग्रेसच्या बाळासाहेब शिवरकर यांनी तुपे यांचा पराभव केला. पुढे १९९५ मध्ये शिवसेनेचे सुर्यकांत लोणकर हे विजयी झाले. १९९९ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने मतदारसंघ हस्तगत केला.
१९९९ आणि २००४ ला काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर लागोपाठ दोनवेळा विजयी झाले. २००९ मध्ये मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेसचे रमेश बागवे यांनी कॅन्टोंमेन्टमध्ये विजय मिळवला. तर २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत भाजपच्या दिलीप कांबळेंनी तत्कालीन ग्रुह राज्यमंत्री असणाऱ्या बागवेंचा पराभव केला. २०१९ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसकडून रमेश बागवे हेच उमेदवार होते. मात्र यावेळी भाजपच्या सुनील कांबळे यांनी त्यांचा पराभव केला.
गेली दोन टर्म बागवे यांचा दारूण पराभव झाल्याने काँग्रेसमध्ये सध्या बदलाचे वारे वाहू लागलेत, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य मिळालेला हा एकमेव मतदारसंघ आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे आपला झेंडा फडकवायचाय, काँग्रेसकडून लढण्यासाठी रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे यांचे नाव आघडीवर आहे. मात्र हे असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश देत बागवे यांना शह देण्याची खेळी खेळण्यात आलीय. रमेश बागवे हे पुणे काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना बदलण्याची मागणी करणाऱ्या गटाचे प्रतिनिधत्व करतायत. बागवे यांचे हे सर्व प्रयत्न सुरू असतानाच अरविंद शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत चार टर्म नगरसेवक राहिलेल्या अविनाश साळवे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला.
नुकतेच जयपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये, असा ठराव झालाय. हाच धागा पकडत बागवे यांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अविनाश साळवे यांच्या रूपाने काँग्रेसला कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तगडा उमेदवार मिळाल्याच दिसत आहे. दलित आणि आंबेडकरी चळवळीमध्ये साळवे यांचे नाव आदराने घेतल जात. आरपीआय गवई गटाकडून दोन वेळा, एकदा काँग्रेसकडून तर २०१७ मध्ये शिवसेना पक्षातून असे गेली चार टर्म साळवे पुणे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत.
आंबेडकरी चळवळीचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, सोबतच उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांचा बोलबाला आहे. सर्व पक्षांमधील नेत्यांसोबत असणारे चांगले संबंध विधानसभा निवडणुकीत साळवे कामी येऊ शकतात. शहर काँग्रेसमध्ये सुरु असणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणात रमेश बागवे हे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे पंख छाटायला निघाले होते. मात्र शिंदे यांनी अविनाश सावळे यांच्या सारख्या तगड्या नेत्याला पक्षात घेत बागवे यांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुजा खेडकर प्रकरणी पुण्यातील वायसीएम रुग्णालयासह अधिष्ठताही अडचणीत; वाचा नेमका काय प्रकार?
-धक्कादायक! आईच्या प्रियकरानेच अल्पवयीन मुलीसोबत केलं ‘हे’ कृत्य; आईचं दुर्लक्ष, पण…
-पुणे विमानतळावरील प्रवास होणार अधिक सुखकर; मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ घोषणा
-काश्मीर खोऱ्यात यंदाही साजरा होणार गणेशोत्सव, पुणे शहरातील मंडळांचं सहकार्य
-मालवणमधील राजकोट दुर्घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक आंदोलन