पुणे : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही दमदार पावसाच्या बरसत आहेत. आजपासून पुढील ५ दिवस विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरवात झाली असून शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरात अचानक झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ११ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या ३ दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमाननगर परिसरात पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान, शहरात अनेक भागात पावसाच्या पाण्याने रस्ते तुंबले आहेत. याबाबत बोलताना ‘यंदाच्या पावसाने नागरिकांचे नुकसान होणार नाही आणि रस्ते तुंबणार नाही, याची काळजी घेणार असून यासंदर्भात लवकरच प्रशासनाची बैठक घेणार आहे’, असे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हणाले आहेत. खासदार होताच पहिल्याच दिवशी पुण्यातील पावसावर मोहोळांनी पुणेकरांना आश्वासन दिले आहे.
जबरदस्त विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर पुणे, रायगड, सांगली, बेळगाव, गोंदिया या जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शहरातील रस्त्यावरुन पाणी वाहताना दिसून येते.
महत्वाच्या बातम्या-
-‘अजितदादांकडे ५५ गायींचा गोठा’, ‘तुतारीवाले गोठा साफ करायला’; उत्तम जानकर- मिटकरी यांच्यात जुंपली
-पालिकेचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा आला समोर; ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुली बुडाल्या
-सुनील शेळकेंनी सांगितलं बारणेंचं मताधिक्य कमी होण्याचं नेमकं कारण; म्हणाले…
-पोलीस -वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे वारकरी संघटनेचं मोठं पाऊल