पुणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईमध्ये शपथ घेतली. मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी पुण्यातील एका रुग्णाला ५ लाख रुपयांची वैद्यकीय सहायता निधीमधून मदत करण्यासाठी पहिली सही केली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या पहिल्या सहीमुळे पुण्यातील चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे या रुग्णाला ५ लाख रुपयांची मदत झाली आहे. ही मदत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाइलवर सही करताना दिले. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्स्प्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसाह्य देण्याची विनंती केली होती.
पुण्यातील येरवडा येथील रहिवासी चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे (वय ५९) असे या रुग्णाचं नाव असून, त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या फाइलवर केली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5 लाखांची मदत…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, आज पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ₹5 लाखांची मदत मंजूर करून त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी केली.
चंद्रकांत कुऱ्हाडे… pic.twitter.com/19iY0hwSMM— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2024
कुऱ्हाडे यांना काही दिवसांपूर्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांनी या निधीची मागणी केली होती. त्यांच्या या सर्जरीसाठी किमान ३० लाखांचा खर्च होता. सगळीकडे मदत मागून देखील कोणतीही मदत मिळाली नाही. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यातून लगेच ५ लाखांची मदत मिळाली. मदत मिळाल्यानंतर कुऱ्हाडे चंद्रकांत यांचा मुलगा यश कुऱ्हाडेनी फडणवीसांचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या-
-एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?; केसरकर म्हणाले, ‘ते मोदी-शहांचं…’
-…म्हणून प्रशांत जगतापांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरले १२ लाख ७४ हजार