पुणे : भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम केल्याने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि भोर मतदारसंघातील मोठं राजकीय घराणे असलेल्या थोपटेंनी शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा सोपवला आहे. त्यातच आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे दिसत आहे.
पक्षात नाराज असलेल्या नाराज नेत्यांची मनधरणी करणं काँग्रेसला जमत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते हताश असल्याची परिस्थिती पहायला मिळत आहे. रोहन सुरवसे पाटील यांनी देखील आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
“रचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्यंत मी काम केले आहे. कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल”, असे रोहन सुरवसे म्हणाले आहेत.
‘सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा अशी माझी अपेक्षा आहे’, असे रोहन सुरवसे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया
-‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
-माजी आमदार संग्राम थोपटेंनी सोडला ‘काँग्रेस’चा ‘हात’; २ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?
-भाजप पुण्याचा कारभारी बदलणार; ब्राह्मण, मराठा की ओबीसी कोणाच्या गळ्यात पडणार शहराध्यक्ष पदाची माळ?
-पुण्यात काँग्रेस भाजप समर्थक आमने-सामने; काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात