पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. महायुतीमध्ये अजित पवार नाराज असून ते नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात होतं. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथा टप्प्यात अजित पवार यांनी स्वतःहून सर्वाधिक लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले होते.
अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या. अनेक ठिकाणी रोड शो देखील केले होते. याच कारणामुळे अजित पवार यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते उमेश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या घशामध्ये इन्फेक्शन झाले असल्याचे सांगत उमेश पाटील यांनी अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | उरुळी देवाची अन् फुरसुंगीत ८४ अनधिकृत होर्डिंग; गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
-पुण्याहून थेट कर्नाटकच्या कत्तलखान्यात उंटांची तस्करी; पुणे पोलिसांकडून ८ उंटांना जीवदान
-पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट
-ऊन सावलीच्या खेळात पुणेकर हैराण; शहराच्या तापमानात पुन्हा होतेय वाढ