पुणे : पुणे शहरामध्ये एकूण १७ टेकड्या असून या वनविभांर्गत येतात. कोथरुडमधील म्हातोबा टेकडीवर आगीच्या ३ घटना घडल्या. त्यानंतर पुणे शहरातील टेकड्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वनभवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली आहे.
शहरातील टेकड्यांवर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्या दृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांना सोबत घेत सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. एका टेकडी निमित्ताने सगळ्या टेकड्यांचा प्रश्न समोर आला आहे. म्हातोबा टेकडीवर ३ आगीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अडीच हजार झाडाचे नुकसान झाले. त्यामुळे टेकड्यांवर सीसीटीव्ही लावणे, गार्ड नेमणे, ग्राउंडवर टॉवर उभे करणे, गवत साचून न देणे, मशीनच्या साह्याने गवत काढणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
“कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर सुमारे ६ हजार ५०० वृक्षांची लागवड केली होती. त्यांना आग लावून सुमारे २ हजार ५०० वृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. टेकड्यावरील झाडांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी, तणांची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. संरक्षक भिंतीची जलदगतीने कामे पूर्ण करावे. वन क्षेत्र संरक्षित करावेत, प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. टेकड्यांवरील झाडांच्या देखभालीसाठी टेकड्यावरील ठिकाणे निश्चित करुन उच्च क्षमतेचे सोलारयुक्त सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकाची संख्या २ वरुन ८ करावी. त्यांना गस्त घालण्यासाठी लागणाऱ्या दुचाकी, सौर दिवे या बाबींसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्याचा येईल”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
आता मी थांबणार नाही. टेकड्यांवर गैरप्रकार करणाऱ्या कोणाला सोडू नये. माध्यमांनी यासंदर्भात जागृत राहिले पाहिजे. त्याबरोबर टेकड्यांवर होणारे अतिक्रमण किंवा इतर गोष्टीवर चर्चा बैठकीत चर्चा झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मामाला संपवण्याची तयारी; पुण्यात बंदुक घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
-पुण्याच्या एफसी रोडवरही वाल्मिक कराडचं घबाड; एकाच इमारतीत कोट्यावधींची संपत्ती
-पुणे तिथे काय उणे! पुणेकर वाहतूक कोंडीतही ठरले अव्वल
-पुण्यात लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद; अन् ५ मिनटापूर्वीच आला ‘तो’ फोन