पुणे : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या २२ फेब्रुवारीला अमित शहा हे पुणे शहराचा दौरा करणार असून त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक पुण्यातील कोरेगाव पार्क येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीला अमित शहा उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले. महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या भाजपला सर्वात अधिक जागा मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या त्यानंतर शहा पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय गृह विभागाच्या बैठकीचे आयोजना पुणे पालिकेकडे असून या बैठकीची जबाबदारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी.बी. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या घरांचे वाटप करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठीदेखील अमित शहा उपस्थित राहणार आहेत. बालेवाडी येथे हा कार्यक्रम होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेंसाठी घेतला उदय सामतांशी पंगा, आता शिंदेसेनेत प्रवेशासाठी धडपड सुरू
-‘कॉमेडी शो’च्या नावाखाली अश्लिल भाषा; समय रैनाचा उठला बाजार, नेमकं घडलं काय?
-‘व्हॅलेंटाईन डे’ला चढली झिंग, पुण्यात महिलेचा दारु पिऊन तमाशा; भर रस्त्यात बसली अन्…
-“सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब”; पुण्यात नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी
-Metro News: शंकर महाराजांच्या समाधी स्थळाला धक्का नाही; महामेट्रोने मार्ग बदलला!