पुणे : पुण्याच्या बालेवाडी येथे भाजप प्रदेश कार्यकारिणी अधिवेशन पार पडले. यावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर शरसंधाण साधले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी अमित शहांनी शरद पवारांना राजकारणातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी म्हटले आहे.
‘शरद पवार यांनी १० वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांना पुण्यातील कोणत्याही चौकात भाजपचा १० वर्षांतील हिशोब देतील. विरोधक भ्रष्टाचाराची गोष्ट करत आहेत. देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कोणी केलं तर ते शरद पवार यांनी केलं आहे. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले आहे’, असेही अमित शहा म्हणाले आहेत.
‘राज्यात जेव्हा पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो. राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आला. भाजप पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यात भाजपची सत्ता हवी,’ असा दावा अमित शहा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले
-पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती