पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पुण्यातील साखर संकुल येथे अजित पवारांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली. अजित पवार यांनी हवेली तालुक्यातील दोन साखर कारखान्यांबाबत बैठका घेतल्या आहेत.
हवेली तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर, यशवंत सहकारी साखर कारखाना हे दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यासाठी अजित पवारांनी बैठका घेतल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांच्या कारखान्यावर अजित पवार प्रशासक नेमण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी शिरूरच्या घोडगंगा सहकारी कारखान्याची बैठक लावली होती. या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार माऊली कटकेही उपस्थित होते. अशोक पवारांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंद असून कारखाना चालू करण्यासाठी विरोधी गट आक्रमक आहेत.
अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत ‘अशोक पवार यांनी स्वतःचा खासगी कारखाना चांगला चालवला. पण, घोडगंगा साखर कारखाना बंद पाडला’, अशी टीका करत ‘घोडगंगा कारखान्याच्या बाबतीत जी चूक झाली ती आगामी काळात सुधारू’, असं अजित पवार विधानसभा निवडणुकीत म्हणाले होते. त्यामुळे आता अजित पवार घोडगंगा बाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात नेमकं चाललंय काय? शिपायानेच केला विद्यार्थिनींचा चेंजिंगरूममध्ये व्हिडिओ शूट
-वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला मुख्यबाजार पेठेत उभारू लागल्या, तक्रार करण्यासाठी आमदार थेट पोलिसांत
-महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक; पोलीस आयुक्तांची घेतली भेट
-…म्हणून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाचा खून; तपासात धक्कादायक कारण आलं समोर
-मसाज पार्लरच्या नावाखाली सुरुय भलताच कारभार; पोलिसांनी मारला छापा अन्…