पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिवट्या आमदार म्हणून टीका केली होती. सुनील टिंगरेंवर केलेल्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी उत्तर दिले आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या पुण्यातील पहिल्या ऑक्सिजन पार्क उद्यानाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सुनील टिंगरेंची पाठराखण केली आहे.
‘वडगाव शेरीचे आमदार म्हणून काम करताना सुनील टिंगरे यांनी येथे अनेक विकासाची कामे केली, प्रकल्प केले. मात्र अलीकडच्या काळात कोणतेही कारण नसताना टिंगरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून केला जात आहे. कोणतीही चूक नसताना जनमाणसात प्रतिमा डागळण्यासाठीची वक्तव्य योग्य नाही’, असे म्हणत अजित पवारांनी टिंगरेंवर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
‘आमदार टिंगरेंना ५ वर्षांसाठी निवडून दिले. त्यातील एक वर्षे विरोधी पक्षात गेले, एक वर्षे कोरोनात गेले. उर्वरित ३ वर्षांत महायुतीच्या काळात ही कामे केली आहेत. धडाकेबाज आमदार म्हणून टिंगरेंची ओळख आहे. पुढील पाच वर्षांत वडगाव शेरीकरांनी संधी दिल्यास यापेक्षा अधिक मोठे प्रकल्प या भागात पूर्ण होतील’, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आधी बांधलं मोदींचं मंदिर, आता दिली भाजपला सोडचिठ्ठी; नेमकं काय प्रकरण?
-‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अन्….’; ‘या’ माजी मंत्र्याने केला मोठा दावा
-हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार, पण कधी? पाटील म्हणाले, ‘तो निर्णय …’
-हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सांगितलं फडणवीसांसोबतच्या बैठकीत सत्य
-हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या,