पुणे : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वीच १७ ऑगस्टला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
‘येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्यापूर्वीच १७ ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे नियमात बसणाऱ्या महिलांना मिळतील. असा आमचा प्रयत्न सुरू आहे. हा महिलांचा अधिकार असून महिलांना तो मिळायलाच हवा. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी जनतेने आम्हाला पाठबळ द्यावे. आम्हाला सहकार्य करावे. सरकार आल्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पूर्ण पुढील ५ वर्षे चालू राहील हे वादा करतो’, असे आश्वासन देखील अजित पवार यांनी दिले आहे.
‘जन सन्मान यात्रा’ आणि रक्षाबंधनास आजपासूनच आरंभ!
लाडक्या बहिणींना दादांकडून ‘रक्षाबंधनाची ओवाळणी’ म्हणून १७ तारखेला ३ हजार रुपये मिळणार!#जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra pic.twitter.com/LenuJcAmMC— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 8, 2024
सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांनी ‘लाडक्या बहिणींना दादांकडून ‘रक्षाबंधनाची ओवाळणी’ म्हणून १७ तारखेला ३ हजार रुपये मिळणार!’ असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा लांडगेंकडून ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’चे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद
-‘मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा’, खड्डानाथ, खड्डादादा अन् खड्डेंद्र…; पुण्यात काँग्रेसची बॅनरबाजी
-विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? अजित पवारांनी थेट सांगितला