पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या काही महिन्यांपूर्वी एक धक्कादायक अपघात झाला. या अपघातात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत अलिशान कारच्या भरधाव वेगाने दोन तरुणांना जोरात धडक दिली आणि या अपघातात दुचाकीस्वार अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ट या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी अल्पवयीन आरोपीच्या बड्या बिल्डर बापाने मुलाला होणाऱ्या कारवायांपासून वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. या मध्ये वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यावर देखील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून दोषारोपत्रात देखील टिंगरेंचे नाव आले आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन मृत अनिस अवधियाच्या पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.
टिंगरे यांना उमेदवारी देणे योग्य नव्हते. लोक सर्व राजकारण जवळून पाहत असतात. त्यांना सर्व समजत आहे. त्यामुळे योग्य निर्णय मतदार निवडणुकीत घेतील. आम्ही या प्रकरणी मुबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सुनील टिंगरे यांचा गुन्ह्यात सहभाग नोंदवण्यात यावा याबाबत लवकरच दाद मागणार आहोत, अशी माहिती अवधिया यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे. यावर आता कल्याणीनगर अपघाताचा फटका टिंगरे यांना बसणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद
-सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ
-पुण्यात रंगणार नव्या मैदानात जुन्या खेळाडूंचे सामने; कोण करणार कोणाला चितपट?
-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले; खडकवासल्यातून सचिन दोडके तर पर्वतीतून कोण?