पुणे : पुणे स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले होते. या घटनेने संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर बस स्थानकामधील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावरुन पुणे पोलीस आणि स्वारगेट बस आगाराचे धिंडवडे काढण्यात आले. अशातच आता पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली आहे.
बसस्थानकामध्ये जुन्या, मुदत संपलेल्या आणि नादुरूस्त अशा निकामी झालेल्या एकूण ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे. पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात ‘एसटी’ महामंडळाच्या ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत. या बसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून बसमधील साहित्याची चोरीसारख्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, जुन्या, मुदत संपलेल्या आणि नादुरूस्त अशा निकामी झालेल्या एकूण ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे. येत्या २१ मार्च रोजी या ७२ बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे. या नादुरूस्त बसच्या माध्यमातून २.५० ते ३ कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढला; आजपासून गाय, म्हशीच्या दूध दरात २ रुपयांनी महागले
-पुण्यात महिला असुरक्षितच; स्वारगेट प्रकरणानंतर आता आणखी एका तरुणीवर अत्याचार
-पुणेकरांच्या हितासाठी जगदीश मुळीकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी