पुणे : राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरात तयारी सुरु आहे. तर उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. असंच काही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत घडले आहे. एका कार्यकर्त्यांने अजित पवारांकडे उमेदवारीची मागणी केली असता अजित पवार चांगलेच संतापले.
फटलणमधून अद्याप ओमराजे निंबाळकरांनी अंतिम निर्णय घेतला नाही. त्यापूर्वीच कोरेगावातील कार्यकर्ते अजित पवारांकडे उमेदवारी मागण्यासाठी आले. तेव्हा अजित पवार संतापलेले दिसून आले. ‘महायुतीचं जागावाटप झाल्यावरच अंतिम निर्णय होईल’ असं पवार म्हणाले आहेत.
‘कोणती जागा कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. ही जागा महायुतीत कुणाला सुटते यावर निर्णय घेऊ. आधी कुठली जागा कुणाला सुटणार हे ठरु द्या, काही जागा शिवसेना, काही जागा भाजप तर काही जागा मित्रपक्षाला जाणार आहेत. जागावाटपापूर्वीच मी तुम्हाला काही तरी सांगायचं, जर आपल्याकडे जागाच नसेल तर मी तुम्हाला काय सांगणार. जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांबाबत निर्णय घेणार’, असं अजित पवारांनी म्हणूनही कार्यकर्ते उमेदवारीची मागणी करतच राहिले. त्यावर अजित पवार संतापून म्हणाले की, ‘कळतं का रे तुला काही, मंत्री असून मला उमेदवारी मिळणार आहे की नाही हे माहिती नाही.’
महत्वाच्या बातम्या-
-अंधारेंनी हडपसरमध्ये उमेदवार जाहीर केला, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सुषमाताई…’
-‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर पालिकेची मोठी कारवाई; बेकायदा गाळे उभारण्यामागे कोणाचा हात?
-‘आमचा पदर-बिदर सगळं फाटून गेलंय’; अजित पवार असे का म्हणाले?