पुणे : राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहेत. अशातच इंदापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या या निर्णयावरुन भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी हा भाजपाचा पक्षमंत्र पाटील कधीच समजू शकले नाहीत. म्हणून ते कृतघ्न आहेत’, असे म्हणत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी पाटलांवर टीका केली आहे.
भाजपने गेल्या ५ वर्षात ज्यांना भरभरून दिले ते जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पण इंदापूरमधील मतदार सर्व जाणता आहे . राज्यातील व देशातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामाची जान असल्यामुळे सर्वसामान्य इंदापूरकर भाजपासोबत राहणार आहे आणि भाजपा देखील इंदापूरकरांच्या कायम सोबत राहणार आहेत.
खोबरे तिकडे चांगभलं, अशी राजकीय वाटचाल करणाऱ्या नेत्यांमुळे पक्षाचे काम कधीच थांबत नाही. त्यामुळे इंदापूरमध्ये भाजप येत्या काळात मजबूत होणार आहे. खरं तर या नेत्याला भाजपाने ३० हजार कोटी उलाढाल असलेल्या राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदाची संधी दिली, त्यांच्या स्वतःच्या ताब्यातील साखर कारखान्याला ३०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले.
एके काळी त्याना सुखाची झोप लागत नव्हती, तेव्हा भाजपने यांना भरभरून दिले. त्यानीच आता भाजपाला रामराम केला. पण इंदापूरची जनता अशा संधीसाधू नेत्यांना त्यांची जागा दाखवेल आणि एक दिवस याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कोणी भाजपची साथ सोडली म्हणून भाजप संपणार नाही. तिथे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भाजपने केलेली विकास कामांची जाणीव ठेवून जनता भाजपाच्या सोबत राहील. आणि भाजपा देखील समस्त इंदापूरकरांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि इंदापूरचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी नेहमी पाठबळ देईल, असेही नवनाथ पडळकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने
-राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय
-बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आणखी मोकाट; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
-शरद पवारांनी टिंगरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…
-आधी बांधलं मोदींचं मंदिर, आता दिली भाजपला सोडचिठ्ठी; नेमकं काय प्रकरण?