पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात मोठे वादंग सुरु आहे. त्यातच आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर त्यांचेच सहकारी असणाऱ्या खेड-राजगुरुनगरच्या प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी अतिशय गंभीर आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. कट्यारे यांनी केलेल्या आरोपांवर आता सुहास दिवसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुहास दिवसे काय म्हणाले?
“कट्यारे यांनी आरोप केलेले पत्र मी आज पाहिले आहे. मी एकाच वेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन पातळ्यांवर काम करत असतो. माझ्यावर आरोप करणाऱ्या कट्यारे यांनी यामध्ये गल्लत केली आहे. कट्यारे यांची बदली करण्याचा अधिकार शासनाला आहे. मी जिल्हाधिकारी पदावर येण्याआधी कट्यारे यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची चौकशी करण्यात येते. कट्यारे यांच्याकडून जमिन अधिग्रहणाची भरपाई देण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ते व्यथित झाले असावेत”, असा प्रतिआरोप दिवसे यांनी केला आहे.
“कट्यारे यांनी भरपाई देण्याच्या निकालात अनेक बदल केलेले आहेत. कट्यारे यांनी आरोप करून नियमभंग केलेला आहे. कट्यारे यांचे काहीच चुकीचे केलेले नसेल तर त्यांनी तपासणीला घाबरण्याची गरज नाही. राजकीय संबंध असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही. मी पुणे जिल्ह्यातील २१ आमदारांसोबत आणि ४ खासदारांसोबत काम करतो. भूसंपादनाचे अधिकार जिल्हाधिकार म्हणून माझेच आहेत. कल्याणीनगरमधील अपघातानंतर जिल्ह्यातील ६३ बारची लायसन्स रद्द करण्यात आली आहेत”, असे म्हणत सुहास दिवसे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे
-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी
-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”
-पुण्यात धक्कादायक प्रकार; जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न
-एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी