पुणे : सरत्या वर्षाला बाय बाय आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र जल्लोष पहायला मिळत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावरती असतानाच अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र गिरनार असे त्यांचे नाव असून ते आपले कर्तव्य बजावत असतानाच एका भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नववर्षाचे स्वागत करताना कोणातीह अनुचित प्रकार किंवा कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पीएसआय गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरुन ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता. मात्र, कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली. या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद आणि दुसरीकडे भीषण या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जाती आहे. जितेंद्र गिरनार यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याचे पालकमंत्री कोण? दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘कोणी काहीही म्हणू..’
-दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे
-‘आता पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का?’- अंजली दमानिया
-अलिशान कारमधून एन्ट्री अन् पोलिसांना शरणागती; वाल्मिक कराडकडे कोणाची स्कॉर्पिओ?