पुणे : पुण्यातील बावधन भागात एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना आज २ ऑक्टोबर सकाळी ७ च्या सुमारास घडली. पुण्याहून मुंबईत जुहूच्या दिशेनं जाणाऱ्या या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेऊन उड्डाण करणार होते. मात्र, सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर ठरले आहे.
मुंबईत पोहचण्याआधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचे ट्वीन इंजिन ऑगस्टा १०९ हेलिकॉप्टर हे हेलिकॅाप्टर होते. एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. या हेलिकॉप्टरने येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी साडेसात वाजता उड्डाण केलं होतं. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने येथे धुकं होतं. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
परळी येथे काल धनंजय मुंडे यांच्या सभेसाठी संबंधित हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन गेले होते. परळीहून काल रात्री उशिरा हेलिकॉप्टर पुण्याला आले. तर राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी मुंबईला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आले. मंगळवारी पुण्यात थांबलेले हेलिकॉप्टर मुंबईहून सुनील तटकरे यांना रायगड येथील निवासस्थानी नेणार होते, मात्र त्याआधीच हा दुर्दैवी अपघात झाला.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात ‘पोस्टरवॉर’! रासने समर्थक लागले कामाला; ‘तैयार है हम’चा दिला नारा
-पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा
-भाजपचं ठरलं! ४ मतदारसंघात विद्यमानांना पसंती, पण कॅन्टोन्मेंट अन् कसब्याचं काय?
-काकांचा पुतण्याला आणखी एक मोठा धक्का; विलास लांडेंचं तुतारी फुंकणं फिक्स, कोणी केली घोषणा?
-‘आमचं आयुष्य उद्ध्वस्त करुन ते…’; सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे?