पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी काही संपताना दिसत नाही. अशातच शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीचा धूमाकूळ पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका तरुणाला गजा मारणे टोळीकडून मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. देवेंद्र जोग असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून याच्या नाकाला चांगलीच जखम झाली आहे. तर पाठीवर गालावरही जबर मार बसला आहे.
गजा मारणे टोळीतील अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ अशा तिघांना कोथरुड पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. ही घटना कोथरुडमधील भेलकेनगर चौकात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ कॉलवरुन मारहाण झालेल्या तरुणाची चौकशी देखील केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये सोशल मीडियाचे काम करणाऱ्या व्यक्तीला मारणे टोळीच्या चौघांनी मारहाण केली. शिवजयंतीच्या दिवशी १९ फेब्रुवारी रोजी कोथरुड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ साजरी होत असलेल्या शिवजयंतीवेळी हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याने गजा मारणे टोळीकडून देवेंद्र जोग या तरुणाला बेदम मारहाण झाली. यावरुन याप्रकरणी देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. चिंतामणी सोसायटी, मयुर कॉलनी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून कोथरुड पोलिसांनी तिघांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. तर बाब्या उर्फ श्रीकांत पवार हा आरोपी फरार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?
-हाय सिक्युरटी नंबर प्लेटचं गौडबंगाल! सामान्यांना हजारोंचा भुर्दंड कशासाठी?
-उद्यापासून दहावीची परिक्षा; ७०१ परीक्षा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलला, नेमकं कारण काय?