पुणे : पुणे शहरात माण-मारुंजी रस्त्यावर पुलाचे काम सुरु आहे. या पुलाच्या कामादरम्यान, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रणगाड्याचा बॉम्ब सापडला आहे. हिंजवडी पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेऊन संरक्षण विभागाच्या ताब्यात दिला आहे. ‘माण-मारुंजी रस्त्यावर ब्ल्यूरिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पुलाचे काम सुरु आहे. सोमवारी ३ एप्रिल जेसीबीने खोदकाम करत असताना बॉम्ब सदृश्य वस्तू अढळून आली असल्याचं’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात म्हणाले आहेत.
रणगाड्यामध्ये बॉम्बचा पुढचा भाग असल्याचं हिंजवडी पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र हे बॉम्बशेल खूप जुने असल्याने त्याला सुरक्षितपणे संरक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आले. संरक्षण विभागाकडून त्याची पाहणी करुन विल्हेवाट लावली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही पुणे शहरातील शिवजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान बाणेर येथे ५ डिसेंबर २०२३ रोजी जुने हातबॉम्ब सापडले होते. मेट्रो विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर चतुश्रुंगी पोलीस आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाने सापडलेले बॉम्ब सुरक्षित स्थळी हलवले होते. ते ब्रिटीशकालीन बॉम्ब असल्याचं सांगण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत