पुणे : पुणे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे. याच पुणे शहरामध्ये माणुसकी आणि आई-लेकराच्या नात्याळा काळिमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. प्रचंड कडाक्याच्या थंडीत एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना असून स्थानिकांच्या तसेच पोलिसांच्या मदतीने या नवजात बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाळाच्या रडण्याचा आवाज होऊ नये, म्हणून त्या चिमुकल्याच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्याचा निर्दयीपणा देखील त्या नराधमांनी केला होता. सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर, सिंहगड पोलिसांनी त्या बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या निर्दयीपणे वागणाऱ्यांबाबत सर्व स्तरातून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
सांभाळता येत नसेल तर जन्म तरी का दिला.?
वडगाव मधे आज पहाटे नवीन जन्मलेल्या बाळाला कोणीतरी उघड्यावर,थंडीमधे सोडून निघून गेलं. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याचा चेहरा प्लास्टिक पिशवीने कव्हर केला होता..@PuneCityPolice pic.twitter.com/3w5FP3zPpd— Archana More-Patil (@Archana_Scoope) December 10, 2024
या प्रकरणी आता अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड पोलीस घेत आहेत. परिसरातील रुग्णालयात नुकतेच जन्मलेल्या रुग्णालयातील बालकांची माहिती घेऊनही पोलिसांचा त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहेत. एकीकडे बाळ होत नाही म्हणून लोक देवाला साकडं घालतात, नको तितके दवाखाने करतात अन् दुसरीकडे ज्यांच्या पदरी हे आई-वडील होण्याचं सुख मिळतं, त्यांना हे असे पराक्रम सुचत आहेत. माय-लेकराच्या नात्यााला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे शहर हादरुन गेलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: पिंपरी-चिंचवडमधील लाखो ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज बाद
-‘शिवसेनेच्या वटवृक्षाला लागलेली बांडगुळे हटवा’ शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी, ‘तो’ नेता कोण?
-विजयानंतर हेमंत रासनेंनी मतदारांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानले आभार; ९० हजार नागरिकांना वाटले पेढे
-पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी पुण्यात पाणीबाणी, कोणत्या भागात कपात?
-भाजप आमदार टिळेकरांच्या मामाचे सकाळी अपहरण, संध्याकाळी सापडला मृतदेह; हत्येचं नेमकं कारण काय?