पुणे : पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही समाज अंधश्रद्धेला बळी पडून आपलं नुकसान करुन घेताना दिसत आहे. अशातच सांस्कृतिक वारसा असणाऱ्या पुणे शहरामधून धक्कादायक घटना समोर आली. एक महिलेने एका भोंदूच्या भोंदूगिरीला बळी पडली आणि तिने लाखोंचं नुकसान करुन घतेलं आहे. हडपसर भागातील एका महिलेला एका भोंदूबाबने लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
‘तुझ्या घरावर संकट येणार आहे. ते दूर करतो’, असे सांगत या भोंदूबाबने त्या महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने चोरले अन् पसार झाला होता. याबाबत याबाबत या महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिच्या फिर्यादीवरुन या भोंदूला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. नीळकंठ सूर्यवंशी (वय ३५, रा. कण्हेरसर) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे.
फिर्यादी महिलेच्या पतीला दारुचे व्यसन होते. याचा तिला दररोज त्रास होत असायचा. पतीचे दारुचे व्यसन सोडवण्याचे तिने ठरवले, अन् तिची या भोंदूशी गाठ पडली. ती नवऱ्याला घेऊन खेड तालुक्यातील कण्हेरसर मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेली होती. तिथे आरोपी सूर्यवंशी त्यांना भेटला. त्या वेळी सूर्यवंशीने फिर्यादी महिलेच्या पतीला दारू सोडण्यास सांगितले. सूर्यवंशीच्या सांगण्यावरून पतीने दारू सोडल्याने महिलेचा विश्वास बसला. पतीने दारू सोडल्यावर फिर्यादीचा आरोपीवर विश्वास बसला. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. फिर्यादी महिला आपल्या घरातील, कौटुंबिक अडचणी आरोपीला सांगू लागली.
…अन् भोंदूनं डाव साधला
२५ मार्च रोजी आरोपीने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्या फोन कॉलमध्ये आरोपी फिर्यादीला म्हणाला ‘तुमच्या घरावर मोठं संकट आलं आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतो.’ असं सांगून भोंदू सूर्यवंशी २७ मार्च रोजी हडपसरला गेला. त्याने महिलेला भेटण्यासाठी बोलावले. ‘तुम्ही दागिने घेऊन या मी तुम्हाला दागिने मंतरून देतो’, असे म्हणत येताना मंगळसूत्र, मुलीची सोनसाखळी घेऊन येण्यास सांगितले.
भोंदूवर तुफान विश्वास बसलेली महिला आरोपी सूर्यवंशीला भेटायला गेली. दोघांनी एका रसवंतिगृहात रस घेतला, त्यानंतर त्याने महिलेला एक लिंबू दिले. महिलेकडील दागिने मंतरून देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र, सुवर्णहार, सोनसाखळी असा ऐवज प्लास्टिक पिशवीत ठेवण्यास सांगितले. दागिन्यांची पिशवी त्याने स्वत:कडे ठेवली. महिलेला लिंबू घेऊन पुढे चालण्यास सांगितले. मी सांगितल्यानंतर लिंबू फेकून द्या, असे त्याने सांगितले होते. भोंदू सांगन त्या दिशेने ही महिला चालत राहिली. या भोंदूचा मागून काही आवाज येत नाही हे लक्षात आल्यानंतर तिने मागे वळून पाहिलं अन् तिच्या पायाखालची जमीन सरकली.
भोंदूने तिला पुढे चालत रहायला सांगितले अन् मागच्या मागे हा पसार झाला. तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि पथकाने पसार झालेल्या सूर्यवंशीला पकडले. त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले. सूर्यवंशीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सूर्यवंशीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. एकंदरीतच पुरोगामी, सुसंस्कृत, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या या महाराष्ट्र भूमीवर असे प्रकार वारंवार घडत असून हे कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! शहरात ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज
-पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील ‘या’ ४ शिलेदारांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी
-दर अमावस्थेला नारळ दही-भात, अंडी ठेवत जादूटोणा करायची; महिलेचा व्हिडीओ व्हायरल