पुणे : राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या जवळपास २०० पार झाली आहे. राज्यात अनेकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. राज्यात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरामध्येच असून एकूण रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे केवळ पुण्यातील आहेत. अशातच आता या आजारामुळे मंगळवारी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये सर्वाधिक रुग्ण असून मृत मुलगी देखील याच परिसरामध्ये देखील राहत होती.
मूळची बारामतीमधील किरण राजेंद्र देशमुख (वय- १८) असे जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. किरण ही शिक्षणासाठी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. गेल्या ३ आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्याने तिला त्रास जाणवू लागला. त्यामुळे ती घरी आपल्या आईवडिलांकडे गेली. त्यावेळी तिला अचानक जुलाब आणि अशक्तपणा वाढल्यामुळे तिला घरच्यांनी बारामतीतील डॉक्टरांकडे नेले. तेव्हा डॉक्टरांना तिला असणाऱ्या लक्षणावरून शंका आली आणि त्यांनी पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला.
बारामतीमधील डॉक्टरांनी सांगिल्याप्रमाणे तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २७ जानेवारीपासून तिच्यावर पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरु असताना तिची प्रकृती खालावत होती. अखेर काल मंगळवारी रोजी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील सिंहगड, नांदेड सिटी परिसरात जीबीएस सिंड्रोम या आजाराने बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात १० जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाहेरील, उघड्यावरील पदार्थ तसेच पाणी पिताना विशेष काळजी घ्यावी, असे अवाहन आरोग्य विभागाकडून वारंवार केले जात आहे. जीबीएस आजाराची लक्षणे जावणू लागल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हलर्जीपणा केल्यास किंवा उपचारांना उशिर केल्यास या आजारावर मात करणे अवघड होते.
महत्वाच्या बातम्या-
-कोंढव्यात ‘मुस्लिम मावळा प्रतिष्ठान’कडून शिवजयंती साजरी; राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन
-तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली
-पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा