पुणे : मुंबईमधील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेवरुन पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनेक पालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई देखील करण्यात आली आहे. घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून होर्डिंगचा आढावा घेण्यात आला आहे.
पालिकेने घेतलेल्या आढावा प्रमाणे शहरातील हडपसर, फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांतील तब्बल ८४ अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषदेची घोषणा केली असल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या घोषणेमुळे या गावातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे महापालिका हद्दीत असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने सादर केले आहे. त्यामुळे या गावांचा कारभार आजही महापालिकेकडून सुरू आहे. असे असले तर होर्डिंगवर कारवाईचे अधिकार का नाहीत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्वत: बुधवारी, १५ मे रोजी जंगली महाराज ते अलका चौक दरम्यानच्या होर्डिंगची पाहणी केली होती. अनेक होर्डिंग्ज धोकादायक पद्धतीने लावल्याचे उघड झाले. याची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अलका चौक, खंडोजी बाबा चौकातील स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या होर्डिंगलाही नोटीस पाठवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याहून थेट कर्नाटकच्या कत्तलखान्यात उंटांची तस्करी; पुणे पोलिसांकडून ८ उंटांना जीवदान
-पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट
-ऊन सावलीच्या खेळात पुणेकर हैराण; शहराच्या तापमानात पुन्हा होतेय वाढ
-अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण