पुणे : सध्या देशभरात काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामध्ये २८ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे बोलले जात आहे. आता काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाकडून अनेक कारवाया सुरु करण्यात आली असून दहशतवाद्यांच्या ठाव ठिकाण्यावर जोरदार घाला घालण्यात येत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला करारा जवाब देण्यासाठी भारताने जोरदार तयारी देखील सुरु केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. ‘आपापल्या राज्यातून पाकिस्तानी नागरिकांची ४८ तासांत हकालपट्टी करावी. केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये’, असा फतवाच अमित शहांनी काढला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढले जात आहे. यामधून आका धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
महाराष्ट्रामध्ये एकूण ५ हजार २३ पाकिस्तानी असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून सर्वात जास्त सर्वाधिक २ हजार ४५८ पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात १ हजार १०६ पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर पुण्यात एकूण ११४ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी नागरिक?
1) अकोला (AKOLA) – २२
2 अहिल्यानगर (AHILYANAGAR) १४
3 अमरावती (AMRAVATI C)- ११७
4 अमरावती (AMRAVATI R)- १
5 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD C)- ५८
6 छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD R) – १
7 छत्रपती संभाजीनगर ( AUR. RLY) 0
8 भंडारा (BHANDARA ) 0
9 बीड (BEED)- 0
10 बुलढाणा (BULDHANA)- ७
11 चंद्रपूर ( CHANDRAPUR)- 0
6 धुळे (DHULE) ६
13 धारशिव (DHARASHIV)- 0
14 गडचिरोली (GADCHIROLI)- 0
15 गोंदिया (GONDIA)- ५
16 हिंगोली (HINGOLI)- 0
17 जळगाव (JALGAON)- ३९३
18 जालना (JALNA)- ५
19 कोल्हापूर (KOLHAPUR) – ५८
20 लातूर (LATUR) – ८
21 मुंबई (MUMBAI RLY)- २
22 मुंबई (MBVV)- २६
23 नाशिक (NASHIK C)- ८
24 नाशिक (NASHIK R)- २
25 नागपूर (NAGPUR C)- २,४५८
26 नागपूर (NAGPUR R)- 0
27 नागपूर (NAGPUR RL)Y 0
28 नांदेड (NANDED) ४
29 नंदुरबार (NANDURBAR)- १०
30 नवी मुंबई (NAVI MUMBAI)- २३९
31 परभणी (PARBHANI) ३
32 पालघर (PALGHAR) – १
33 पिंपरी चिंचवड (PIMPRICHINCHWAD) -२९०
34 पुणे (PUNE) – ११४
35 पुणे (PUNE R) -0
36 पुणे (PUNE RLY)- 0
37 रायगड (RAIGAD)- १७
38 रत्नागिरी (RATNAGIRI) ४
39 सातारा (SATARA)- १
40 सांगली (SANGLI)- ६
41 कोल्हापूर (SOLAPUR C) – १७
42 सोलापूर (SOLAPUR R) 0
43 सिंधुदुर्ग (SINDHUDURG) 0
44 ठाणे (THANE C) ११०६
45 ठाणे (THANE R) 0
46 वर्धा (WARDHA) 0
47 वाशिम (WASHIM) ६
48 यवतमाळ (YAVATMAL) १४