पुणे : पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी सूचविलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविला असून तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी हा सध्याचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट (मेटा आर्च) मिलिंद रोडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर शनिवारी या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. गडकरी यांनी या सादरीकरणाचे कौतुक करत तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत करावयाच्या उपाययोजनांबाबत दोन्ही यंत्रणांनी कृती आराखडा तयार केला असून त्याला गडकरी यांनी ३०० कोटी रुपयांच्या खर्चास तत्वत: मान्यता दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळोवेळी बैठका घेऊन; वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पुणे पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करुन; केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या समोर सादरीकरण केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election : राष्ट्रवादी-भाजपच्या वादात शिवसेनेची उडी; कोणत्या मतदारसंघावर केला दावा?
-निवडणुकीपूर्वीच शिरुरमध्ये राडा; घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत ‘अशोक पवार चोर है’चा नारा
-..अन् बघता बघता महापालिकेचा ट्रक गेला थेट खड्ड्यात; नेमका काय प्रकार?
-आयफोन प्रेमींसाठी खूशखबर; आता घरबसल्या अवघ्या १० मिनिटात आयफोन १६ मिळणार हातात, कसा ते वाचा