पुणे : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोयता गँगची शहरात दहशत तसेच भर दिवसा गोळीबार अशा अनेक घटना होत असतात. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील भोंदूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील वानवडी भागात राहणाऱ्या एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार कृष्णनारायण तिवारी (वय ३०), अंतिमा कृष्णा तिवारी (दोघे रा. शक्तीनगर, गौंडा, उत्तर प्रदेश) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. वानवडी भागातील महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका परिचितामार्फत ती महिला या आरोपींच्या संपर्कात आली असल्याचे तिने सांगितले आहे.
गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे. काळी जादू नष्ट करण्यासाठी विधी करावा लागेल, अशी बतावणी केली. त्यानंतर तिवारी महिलेच्या घरी गेला. आरोपींनी महिला आणि तिच्या लहान मुलीला सरबत प्यायला दिले. त्यानंतर तिला गुंगी आली. आरोपींनी मोबाइलवर महिलेची विवस्त्र अवस्थेत फोटो काढले.
वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन हा प्रकार २०२२ ते मे २०२४ दरम्यान घडला. फिर्यादी यांची उत्तर प्रदेश मधील एका ज्योतिषी याच्याशी ओळख झाली होती. आपले पती सोबत नेहमी भांडण होत आहे. असे तिने ज्योतिषी तिवारी याला सांगितले. यावर तुमच्या घरावर कोणी तरी काळी जादू केली आहे, ती नष्ट करतो, असे सांगत एके दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालून त्या तरुणीच्या घरी गेला.
पूजा झाल्यावर प्रसादात त्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अंतर्वस्त्रातील फोटो काढले. हे फोटो तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या इतरांना पाठवेल, अशी धमकी देत त्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. धमकीला घाबरून त्या तरुणीने १५ लाख ३० हजार रुपये त्याला पाठवले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, मावळात एकूण मतदान किती? फायनल आकडा आला
-आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले अन् मगच प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल
-पत्नी नांदायला येईना, पठ्याने दिली अख्या शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं काय घडलं?
-कर्वे रोड ते कर्तव्यपथ! मतदान संपताच लागले मोहोळांचे ‘खासदार’ म्हणून फ्लेक्स
-‘माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेय’- प्रवीण तरडे