पुणे : राज्यात बारावीच्या परिक्षेला सुरवात झाली असून मंगळवारी पहिला पेपरही झाला. बोर्डाच्या परिक्षांचा ताण अनेक विद्यार्थींना ताण आल्याचेही अनेकदा पहायला मिळते. तसेच अपयश आल्याने काही विद्यार्थ्यांकडून टोकाची पावले देखील उचलली जातात. अशातच आता बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थाने टोकाचं पाऊल उचल्याचं पहायला मिळालं आहे. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी एका विद्यार्थ्यांने ताण आल्याने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याची घटना समोर आली आहे.
बारावीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू झाली असून यंदा परीक्षेत गैरप्रकार, कॉपी टाळण्यासाठी राज्य मंडळासह शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासनाकडून कठोर उपायोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी कॅमेऱ्यांचा देखील वापर केला जात आहे. बारावीच्या परिक्षेला बसलेल्या या विद्यार्थ्याने इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका पाहिली आणि थेट दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नऱ्हे येथील परिक्षा केंद्रामध्ये मंगळवारी ही घटना घडली आहे.
पुणे विभागीय मंडळाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी नऱ्हे येथील परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू झाल्यावर अर्ध्या तासानंतर एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून खाली उडी मारली. आधी तो पहिल्या मजल्यावर पडला. त्यानंतर त्याने पुन्हा उडी मारली. या वेळी शिक्षण विभागाचे भरारी पथक संबंधित परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. उडी मारल्याने जखमी झालेल्या संबंधित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याने उडी मारल्याचे त्यांनी सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामाला मिळणार गती, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक
-रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
-अजित पवारांच्या सूचनेनंतर पुणे पोलीस अॅक्शनमोडवर; स्वयंघोषित भाई, गुंडांची काढली धिंड अन्…