पुणे : पुणे महानगरपालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांचे पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख पदावर येण्या आधीचे कारनामे पाहता राज्य सरकारने त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. पुणे पालिकेत आरोग्य प्रमुख पदावर बसण्यासाठी देखील डॉ. भगवान यांनी अनेक खटाटोप केले आहेत.डॉ. भगवान पवार हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मर्जी राखून पुणे महापालिकेमध्ये आरोग्य प्रमुख पदावर बसले. पण पवार यांच्या कारभारामुळे शिंदे सरकारने त्यांना निलंबित करण्याचा डोस दिला आहे.
डॉ. पवार यांनी सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी असताना त्यांच्यावर महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण, महिला सहकाऱ्यांना मानसिक त्रास देणे, कामात अनियमितता असल्याचा ठपका होता. त्यातच पुणे महापालिकेत सध्या कार्यरत असणाऱ्या पदासाठी अधिकाऱ्यांची स्पर्धा सुरु असतानाही आरोग्यमंत्र्यांना शब्द देऊन डॉ. भगवान पवार हे महापालिकेत आले. डॉ. पवार यांच्यावर असलेल्या आरोप, संशयाप्रकरणाची चौकशी करण्याच्या हेतूने आरोग्य खात्यातून मोठी यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती.
शिंदे सरकारच्या आरोग्य खात्याकडून मोठी यंत्रणा चांगलीच कामाला लागली आणि भगवान पवार यांच्याविरोधात वर्ष भरापूर्वी फाईल तयार करुन तात्कालीन विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर डॉ. भगवान पवार यांनी शिंदे सरकारमध्ये हातचालाखी करत आपली चौकशी थांबविण्याचा देखील प्रयत्न केला होता. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत जुवळून घेत, महापालिकेतील महत्त्वाचे आरोग्य प्रमुखपद मिळवले होते. अखेर शिंदे सरकारने त्यांच्या कारनामे उघकीस आणले आणि थेट घरचा रस्ता दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; जूनमध्ये ‘या’ दिवशी होणार मतदान
-Health Update | सर्दी-खोकला असताना भात खाल्ला तर काय होते? वाचा सविस्तर
-हार्दिक पांड्या-नताशाचं बिनसलं? नताशा स्टॅनकोविकचा सिनेक्षेत्राला ‘रामराम’
-Pune Hit & Run | विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; आणखी २ गुन्हे दाखल करणार