पुणे : पुणे महापालिकेकडून मिळकतकर वसुलीची मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे. कर थकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पालिकेकडून उचलला जात आहे. सामान्यांवर कारवाई केली जात असली तरी बड्या थकबाकीदारांवर कारवाई केली जात नाही, अशी कायम ओरड असते. मात्र आता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धारिष्ट दाखवत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंची पुण्यातील मध्यवस्ती डेक्कन भागात असणाऱ्या मालमत्तेला टाळे ठोकले आहे.
राणे यांनी डेक्कन भागात असलेल्या आर. डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने पालिकेच्या मिळकतकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सुमारे साडेतीन कोटींची थकबाकी असल्याने वारंवार नोटीसा बजावूनही हा कर भरला जात नव्हता. त्यामुळे अखेर महापालिकेने ३ मजल्याच्या मिळकतीचे वरचे २ मजले सील केले आहेत. नीलेश राणे यांच्यावर मिळकतकराची थकबाकी थकली होती. ३ कोटी ७७ लाख ५३ हजार ८०३ रुपये एवढी रक्कम मागील तीन वर्षांपासून थकलेली आहे.
राणेंची ही मिळकत सील करताना मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. राणे यांची मिळकत जप्त केल्याची कबुली विभागाच्या वरिष्ठांनी दिली आहे. राणे यांच्या मिळकतीचा थकबाकी मिळकतकर भरावा, याबाबत महापालिकेकडून अनेकदा नोटीसा बजावूनही हा कर भरला जात नव्हता. मात्र, अखेर महापालिकेने तीन मजल्यावरील राणे यांची मिळकत सील केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; १० ते १२ गाड्यांची तोडफोड
-सासवडमध्ये कांद्याच्या शेतात अफूची लागवड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
-“जबाबदारीच्या पदावर बसलेली लोक पोरकट बोलतात”; शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं
-“जरांगेंना शरद पवार, रोहित पवारांकडून मदत मिळते, त्यांचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे”
-पुण्यात बनवल्या जात होत्या बनावट नोटा; पोलिसांनी ६ जणांना केलं जेरबंद