पुणे : पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहरातील वाहतूक व्यवस्था वर्षभरापूर्वी फक्त पीएमपीएमएलवर होती. मागील वर्षी पंतप्रधान नरेंदी यांनी पुण्यातील २ मार्गावर मेट्रो सुरु केली. त्यानंतर पुणेकरांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी पुणे लोकल सुरु केली. पुणे मेट्रो सुरु झाल्यापासून पुणेकरांनी इतर वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास करण्याला प्राधान्य दिले.
पुणे मेट्रोने शनिवारी, रविवारी सवलत, विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा प्रवास सुरु केला. आता पुणे मेट्रोने गणेश विसर्जनाच्या दिवशी नवीन विक्रम रचला आहे. पुणे मेट्रोतून एकाच दिवसात तब्बल साडेतीन लाख प्रवाशांची प्रवास केला असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रोच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
शहरात मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरी होतो त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये राज्यभरातून अनेक भावीक सामील होत असतात. तसेच विसर्जनाच्या दिवशी अनेक रस्ते बंद असतात. त्यामुळे पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करत अनंत चतुदर्शीला लाडक्या गणरायाला निरोप दिला. लाखो लोकांनी मेट्रोने प्रवास केल्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने नवीन विक्रम रचला आहे. मंगळवारी एकाच दिवसात तीन लाख ४६ हजार ६३३ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे मेट्रोला ५४ लाख ९२ हजार ४१२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक; कोणत्या २ बड्या नेत्यांना घेणार सोबत?
-महाविकास आघाडीत कोथरुडची जागा ठाकरेंकडेच; इच्छुकांपैकी कोणत्या शिलेदाराला मिळणार संधी?
-छत्रपती शिवाजी महाराजांचा २१ फुटी अश्वारूढ पुतळा; ‘शिवतांडव’चे सादरीकरण ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू
-शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?
-पठारेंच्या हाती तुतारी मात्र उमेदवारीची वाट खडतर, वडगाव शेरीवर ठाकरेसेनेचा दावा कायम