पुणे : पुणे शहरामध्ये विस्तारित मार्गांवरील सेवा सुरु झाली आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या दोन्ही मार्गांवरील प्रवासी संख्या दुप्पटीने वाढ झाली आहे. पुणे मेट्रोने ३० जून रोजी १ लाख ९९ हजार ४३७ प्रवाशांची विक्रमी संख्या गाठून तब्बल २४ लाख १५ हजार ६९३ ची एकूण कमाई झाली आहे. जी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.
पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळतर्फे वारकऱ्यांसाठी पुण्यात मेट्रो प्रवासाच आयोजन करण्यात आले. सिविल कोर्ट मेट्रो स्टेशनपासून पिंपरी मेट्रो स्टेशनपर्यंत वारकऱ्यांना मेट्रो प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. मेट्रो प्रवासामध्ये दरम्यान वारकरी विठू नामाचा गजर करणार आहे.
पीसीएमसी मेट्रो स्थानकात सर्वाधिक १९,९१९ प्रवाशांची नोंद झाली असून त्यापाठोपाठ पीएमसी (१८,०७९), शिवाजीनगर (१७,०४६), पुणे
रेल्वे स्थानक (१५,३७८) आणि रामवाडी (१४,७७०) येथे प्रवाशांची सर्वाधिक नोंद झाली. याव्यतिरिक्त, जिल्हा न्यायालय स्थानकावरून सुमारे ५१,०२६ प्रवाशांनी त्यांची मार्गिका बदलली. पुणे मेट्रोच्या स्थानकांपैकी पीसीएमसी मेट्रो स्टेशन, पीएमसी, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्टेशन, रामवाडी, जिल्हा न्यायालय, वनाझ, डेक्कन जिमखाना, नश स्टॉप आणि भोसरी ही प्रवासी संख्येच्या बाबतीत रविवारी विक्रमी १० स्थानके होती.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ
-पुणेकरांनो सावधान! आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण; रुग्णसंख्या ६ वर पोहचली
-भुशी डॅम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; पर्यटकांना संध्याकाळी संचारबंदी
-टिळेकर सुटले! हडपसरमध्ये अजितदादांच्या तुपेंना की शिंदेंच्या भानगिरेंना संधी?
-विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; योगेश टिळेकरांसह आणखी ४ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब