पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील भूमिगत मर्गिकेचे लोकार्पण झाले. पुणे मेट्रोचा ३३.२ किमीचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाला आहे. सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६० हजार असून ती टप्याटप्याने वाढतच जाणार आहे. यामध्ये प्रवाश्यांच्या सोयीसाठी फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी पुणे मेट्रोने टीएस स्विच ई-राइड प्रा. लि. या कंपनी बरोबर काल रोजी सामंजस्य करार केला आहे.
प्रस्तावित योजनेत पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या पीसीएमसी, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक, आनंदनगर, वनाझ या १० मेट्रो स्थानकांवर टीएस स्विच ई-राइड प्रा. लि. ही कंपनी सेवा सेवा प्रदान करणार आहे. ‘स्विच ई-राइड’ या ब्रँडच्या नावाने ५० ई-बाइक मार्फत ही सेवा दिली जाणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मोबाइल ॲप डाउनलोड करावे लागणार आहे.
KYC (कोणतेही सरकारी फोटो आयडी कार्ड किंवा निवसी पुरावा, वीज बिल) पूर्ण करून या सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. Android मोबाइलमधील प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. सेवा आजून सुरक्षित, अखंड, लाइव्ह ट्रॅकिंग आणि, सहाय्यतेसाठी ग्राहक सेवा, जिओ-फेन्सिंग सक्षम करण्यात येणार आहे. भविष्यात पुणे मेट्रो मोबाइल ॲप्समध्ये एकत्रित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर (मोबाइल ॲप्स) ही सेवा उपलब्ध असणार आहे.
ई-बाइक फीडर सेवेसाठी संबंधित मेट्रो स्टेशनवर बॅटरी चार्जिंग स्टेशन्स (प्लग-इन आणि स्वॅपिंग) उपलब्ध करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या काळात ही योजना मेट्रो स्टेशन्स आणि जिथे सुरक्षित ‘डॉकिंग स्टेशन्स’ उभारण्याची जागा उपलब्ध असेल अश्या शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट्स/आयटी पार्क्स आणि SEZs, मोठ्या सोसायट्या आणि सरकारी कार्यालये यांच्या दरम्यान चालवण्याची आहे.
ई-बाईकची वैशिट्ये कोणती?
-गती – जास्तीत जास्त 25 KMPH
-क्षमता – 2 व्यक्ती (जास्तीत जास्त 150 किलो).
-बॅटरी – ‘प्लग-इन आणि स्वॅपिंग’ मॉडेल्ससाठी सुसंगत.
-एका रिचार्जमध्ये जास्तीत जास्त 80 किमी.
-5 मिनिटांपेक्षा कमी वेळात बॅटरी स्वॅप करणे.
-मदतीसाठी मोबाइल ॲपवर ‘SOS’ बटण उपलब्ध आहे.
-कीलेस स्टार्टिंग – मोबाइल ॲप्सवर सुरू आणि बंद करण्याची सोय.
-लाइव्ह ट्रॅकिंग आणि जिओ-फेन्सिंग
यासाठी प्रस्तावित भाडे कसे असणार?
-प्रति मिनिट – १ रुपया ५० पैसे
-दर तासाला – ५५/- रुपये
-२ तासांसाठी – ११०/- रुपये
-३ तासांसाठी – १६५/- रुपये
-४ तासांसाठी – २००/- रुपये
-६ तासांसाठी – ३०५ रुपये
-२४ तासांसाठी – ४५०/- रुपये
महत्वाच्या बातम्या-
-‘ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागा’; संजय राऊतांंच्या ‘त्या’ टिकेवरुन मनसे आक्रमक
-परिक्षेला गेला इंग्रजीचा पेपर पाहिला, अन् विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल
-शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामाला मिळणार गती, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक
-रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?