पुणे : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला आहे. अजित पवार या वर्षी अकराव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला असून यामध्ये त्यांनी पुणे मेट्रो संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागात मेट्रोचे जाळे पसरलेले आहे. मात्र, पुण्याच्या आजुबाजूला देखील मेट्रोचे जाळे पसरणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. पुणेकरांच्या मेट्रोसाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच पुणेकरांना या मार्गिकांचा लाभ मिळणार आहे. पुण्यात एकूण २३ किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. सध्या दररोज दीड लाख पुणेकर मेट्रोने प्रवास करत आहेत. नवीन मार्ग सुरू झाल्यास या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागात मेट्रोचे जाळे पसरलेले आहे. मात्र, पुण्याच्या आजुबाजूला देखील मेट्रोचे जाळे पसरवण्यात येणार असून स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पाला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत खडकवासला, स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप- वारजे -माणिकबाग या दोन मार्गीकांच्या ९८९७ कोटी रूपयांच्या प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे, अशी माहिती अजित पवारांनी आजच्या अर्थसंकल्पामध्ये दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाडक्या बहिणींसाठी आणखी ३६ हजार कोटींची तरतूद पण तरीही २१०० रुपये नाहीच
-आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार
-शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या अंगावर ओतलं पेट्रोल अन्…
-पुण्यात शरद पवार गट आक्रमक; शहराध्यक्षांकडून आंदोलक कार्यकर्त्यांचं निलंबन, नेमका काय प्रकार?
-उषा काकडेंचा आत्महत्येचा प्रयत्न की फूड पॅायझनिंग? रुग्नालयाने दिली महत्वाची माहिती